Home ताज्या बातम्या लाख टन कांदा आयात करणार

लाख टन कांदा आयात करणार

0

नवी दिल्ली :

 राजधानीत दराची शंभरी गाठलेल्या कांद्याचे दर कमी करण्यासाठी एक लाख टन कांदा आयत करण्याचा निर्णय सरकारने शनिवारी घेतला कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी एमएमटीसीकडून हा कांदा आयात करण्यात येईल. त्याचे वितरण नाफेडमार्फत करण्यात येईल. कांद्याच्या किमंती आटोक्‍यात आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला, असे अन्न आणि ग्राहक पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितले.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील पहिल्या निविदेची मुदत 14 नोव्हेंबरला संपत आहे. तर दुसऱ्या निविदेची मुदत 18 नोव्हेंबरला संपत आहे. यापुर्वी कांदा आयतीला प्रतिसाद मिळाल नव्हता. त्यामुळे यंदा इजिप्त, तेहरान, तुर्के आणि अफगाणीस्तानातील खासगी व्यापाऱ्यांकडूनही निविदा मागवण्यात आल्या आहेत.