Home पोलीस घडामोडी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने माणगांव पोलीस ठाण्यात नागरिकांचे समुपदेशन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने माणगांव पोलीस ठाण्यात नागरिकांचे समुपदेशन

0

बोरघर / माणगाव : ( विश्वास गायकवाड ) शासनाच्या विविध विभागातील वाढता भ्रष्टाचार बघता नागरिकांनी न घाबरता कोणीही शासकीय कार्यलयात कामाच्या मोबदल्यात स्वतः किंवा मध्यस्थी च्या माध्यमातून पैसाची मागणी करीत असेल तर आमच्या लाचलुचपत कार्यलयास तात्काळ 02141-222331 व टोल फ्री क्रमांक 1064 या वर फोन करून कळवा असे अहवान पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी माणगाव पोलिस ठाण्यात घेतलेल्या कार्यक्रमात दिनांक 4/11/19 रोजी काढले.

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अलिबाग च्या वतीने लोकांमध्ये सरकारी कामाच्या मोबदल्यात लाच देणे अथवा लाच घेणे या संदर्भात जनजागृती व्हावी याकरिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ समाजसेवक संजय(आण्णा) साबळे, पोलीस हवालदार स्वप्निल कदम इत्यादी मान्यवरांनसोबत माणगांव तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. या वेळी पुढे श्री बकाले म्हणाले कि , जर कोणताही शासकीय अधिकारी , कर्मचारी कायदेशीर कामाकरितां पैशाची मागणी करीत असेल , सातबारा नोंदी करीता , शाळेतील दाखले काढण्याकरीता किवा अपंगत्व दाखले काढण्याकरीता पैशाची मागणी करीत असेल तरी आम्हांला तात्काळ कळवा आम्ही करवाई त्याच्यावर करू असे म्हणाले. तसेच एखद्या शासकिय अधिकारी वा कर्मचाऱ्यांचे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असेल तरि आम्हांला कळवा आम्ही तुमचे नाव गुपित ठेऊन त्या व्यकिवर करवाई करू असे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकोले म्हणाले. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अलिबाग यांच्या पोलीस टीमने माणगांव तालुक्यातील जनतेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधात्मक जनजागृती पर नागरिकांचे समुपदेशन केले.