लातुरात तरुणीला जाळण्याचा प्रयत्न, शासकीय रुग्णालयात दाखल

- Advertisement -

लातूर :हिंगणघाट-औरंगाबादनंतर लातुरातदेखील 18 वर्षीय तरुणीचा चेहरा जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर शहरातील दीपज्योतीनगरात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीला रॉकेल टाकून जाळण्याची घटना घडली आहे. त्यात तरुणीचा चेहरा 15 % भाजला असून तिला लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर तरुणीची परिस्थिती गंभीर असून तिला कोणी पेटवले ? यामागे काय षड्यंत्र आहे ? या प्रश्नांची उकल पीडित मुलीच्या जबाबावरूनच होणार आहे. चेहरा गंभीर भाजल्याने तिला अद्यापही बोलता येत नाही. त्यामुळे पोलिसांना अजूनही या घटनेबाबत धागेदोरे मिळाले नाहीत. या घटनेबाबत संशय असून मुलीने स्वतः पेटवून घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत अधिकृत माहिती अजून पोलिसांनी दिली नाही.

- Advertisement -