Home शहरे उस्मानाबाद लिंक करा आधार अन्यथा होईल हे नुकसान

लिंक करा आधार अन्यथा होईल हे नुकसान

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । १४ जुलै : राज्य सरकारने एम्पलॉयमेंट नोंदणी कार्ड  www.mahaswayam.inहे वेबपोर्टल विकसित केले आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारासाठी हे उपयोगी पडते.

नोकरी इच्छूक उमेदवार, कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवार व या वेबपोर्टलवर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्याप पर्यंत आपले आधार कार्ड एम्पलॉमेंट कार्डशी लिंक केलेले नाही. त्यांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करुन घ्यावेत.

संबंधित उमेदवारानी आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट (अद्यावत) न केल्यास आपली नोंदणी 15 ऑगस्ट 2020 अखेर रद्द होईल, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.