हायलाइट्स:
- अभिनेत्री लिसा हेडन तिसऱ्यांदा झाली आई, दिला मुलीला जन्म
- सोशल मीडियावर चाहत्याला रिप्लाय देताना लिसानं शेअर केली गोड बातमी
- प्रेग्नन्सीच्या संपूर्ण काळात सोशल मीडियावर सक्रिय होती लिसा हेडन
प्रेग्नन्सीच्या काळात सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या लिसानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये जून महिन्यात तिसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तिचे चाहते या गुड न्यूजची आतुरतेनं वाट पाहत होते. अशात एका चाहत्यानं लिसाच्या फोटोवर कमेंट करताना, ‘तुझं तिसरं बाळ कुठे आहे हे सांगशील का?’ असं लिहिलं. चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना लिसा म्हणाली, ‘माझ्या कुशीत.’ लिसाच्या या उत्तरानंतर लिसानं तिसऱ्या बाळाचं स्वागत केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
दरम्यान प्रेग्नन्सीच्या संपूर्ण काळात लिसा हेडन सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. तिनं या काळात अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. जे अनेकदा व्हायरल झाले होते. लिसानं काही महिन्यांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर करताना ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
दरम्यान लिसा हेडनने ‘आयशा’, ‘हाऊसफुल ३’, ‘क्वीन’ सारख्या चित्रपटात काम केलं आहे. ‘क्वीन’ चित्रपटातील कंगनासोबत लिसाने केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. लिसाने तिचा बॉयफ्रेण्ड डिनो लालवानीसोबत लग्नगाठ बांधली होती.