Home मनोरंजन लॉकडाउनमध्ये घरूनच ऑडिशन आणि…मीरा जोशीनं शेअर केला वेब सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव

लॉकडाउनमध्ये घरूनच ऑडिशन आणि…मीरा जोशीनं शेअर केला वेब सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव

0
लॉकडाउनमध्ये घरूनच ऑडिशन आणि…मीरा जोशीनं शेअर केला वेब सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव

[ad_1]

रामेश्वर जगदाळे

चित्रपट, मालिकांमधून बऱ्याचदा नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. ही मंडळी जेव्हा सकारात्मक भूमिका साकारतात तेव्हाही त्यांना तितकाच चांगला प्रतिसाद मिळतो. या यादीत अभिनेत्री मीरा जोशी हिचं नाव आवर्जून घेता येईल.

विविध प्रकारच्या नृत्याचे व्हिडीओजमुळे मीराचं कौतुक केलं जातं. तिने आजवर साकारलेल्या खलनायिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. सध्या ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. नेहमी नकारात्मक भूमिका साकारणारी मीरा ‘इंदोरी इश्क‘ या वेब सीरिजमध्ये मात्र सकारात्मक भूमिकेत दिसतेय. यामधील तिने साकारलेल्या आलिया या व्यक्तिरेखेमुळे तिचं सध्या कौतुक होतंय.


‘दिग्दर्शक समीर कक्कड आणि कास्टिंग दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांच्यामुळे मला ही संधी मिळाली. लॉकडाउनमध्ये घरूनच मी ऑडिशन दिली. आजपर्यंत मी खलनायिका म्हणूनच काम करत आले आहे. चेहऱ्याचे भाव आणि एकंदर सर्वच गोष्टी बघता त्याच पद्धतीचं काम येतं होतं. पण ‘इंदोरी इश्क’ या सीरीजमध्ये मी साकारलेली आलियाची भूमिका माझ्या आजवरच्या कामापेक्षा खूप वेगळी आहे. आलिया साकारताना थोडं आव्हान होतं. कारण २० वर्षांची प्रेमात रमणारी मुलगी मला साकारायची होती.

जय भोले नाथ! अभिनेत्री मीरा जोशीनं केला अनोखा रेकॉर्ड,चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
आम्ही दिवसाला एकच सीन शूट करत होतो त्यामुळे अनेक बारकावे शिकता आले. नेहमीच्या धाटणीला सोडून वेगळं काम करायचं होतं. या वेब सीरिजमुळे मला ती संधी मिळाली’, असं मीरानं सांगितलं. सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्याचं ती सांगते. ‘इंदोरी इश्क’ ही वेब सीरिज कुणाल मराठे यांच्या ‘ठर्की’ या पुस्तकावर आधारित आहे. समित ककड्डने ती दिग्दर्शित केली असून रित्विक साहोरी, वेदिका भंडारी आणि अक्षय कुलकर्णी हे कलाकारदेखील या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.



[ad_2]

Source link