Home ताज्या बातम्या लॉकडाऊन:आरबीआयची कारवाई, तीन बँकांना ठोठावला कोट्यावधींचा दंड

लॉकडाऊन:आरबीआयची कारवाई, तीन बँकांना ठोठावला कोट्यावधींचा दंड

लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन बँकांना 6.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया, कर्नाटक बँक आणि सारस्वत कॉ-ऑपरेटिव्ह बँकेचा समावेश आहे. या बँकांनी आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

रिझर्व्ह बँकेने सांगितले की बँक ऑफ इंडियाने केंद्रीय बँकांच्या निमयावलीतील काही तरतूदींचे पालन केले नाही. या कारणामुळे बँक ऑफ इंडियाला 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ज्या नियमांचे उल्लंघन केले त्यामध्ये उत्पन्न मान्यता, संपत्ती वर्गीकरण आणि अग्रीम संबंधी तरतूदींचा समावेश आहे.

याच प्रकारच्या प्रकरणात कर्नाटक बँकेला 1.2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेला 30 लाखांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने ही कारवाई अशा वेळी केली आहे जेव्हा एनपीएबाबत चिंता वाढत चालली आहे.