लॉकडाऊनच्या काळात औषधाचे पोस्ट पार्सल पोहोच केले

- Advertisement -

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. रेल्वे एसटी बंद असल्यामुळे पोस्ट टपाल वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने दिल्लीच्या औषधाचे पार्सल नाशिकच्या पोस्टात अडकून पडले होते. कोपरगाव पोस्टाचे इन्स्पेक्टर विनायक शिंदे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुणे येथून स्पेशल पोस्टाची गाडी पाठवून नाशिक पोस्टातून औषधाचे पार्सल शिर्डी येथे ताब्यात घेतळे आणि तातडीने रात्रीच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आश्रमातील महिलेपर्यंत पोहोचवून माणूसकीचे दर्शन घडविले.

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन आहे. याच दरम्यान संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राहणाऱ्या प्रेरणा महानुभाव यांना दर महिन्याला त्यांचे घरचे दिल्ली येथून औषध नियमीतपणे पाठवत असतात आणि त्यांना ते वेळोवेळी संवत्सर पोस्टाचे कर्मचारी आश्रमात पोहोच करत असतात. 17 मार्च रोजी त्यांच्या घरच्यांनी औषधे पर्सलने पाठवली. परंतु सदरच्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात रेल्वे एसटी बसेस बंद करण्यात आले. त्यामुळे टपाल येण्यास अडचणी निर्माण झाले होते. सदरचे पार्सल हे नाशिकच्या पोस्टात पडून होते. त्याकरिता कोपरगाव पोस्टाचे इन्स्पेक्टर विनायक शिंदे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुणे येथून स्पेशल पोस्टाच्या गाडीने नाशिकच्या पोस्टात पाठवून रात्री शिर्डी येथून पार्सल ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री साडे आठ वाजता संवत्सरच्या पोस्ट ऑफिसच्या पोस्ट मास्तर दत्तात्रय गायकवाड यांना फोनवर संपर्क साधला असता डाक आवेक्षक अर्जुन मोरे डाक निरीक्षक विनायक शिंदे दत्तात्रय गायकवाड जीवन पावडे चौघांनी गुरुवारी (2) रोजी रात्री प्रेरणा महानुभाव यांना मेडिकल पार्सल पोहोच केले आहे.

- Advertisement -