Home ताज्या बातम्या लॉकडाऊनमध्ये साताऱ्यातील ‘हे’ गाव केलं पाणीदार

लॉकडाऊनमध्ये साताऱ्यातील ‘हे’ गाव केलं पाणीदार

सातारा : लॉकडाऊन अनेक उद्योगधंदे बंद पडले तर काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं आहे. एच आर पदावर काम करणारे योगेश चव्हाण आपल्या गावी आहे होते. लॉकडाऊनमुळे गावी आल्यावर गावातील अनेक समस्या त्यांना दिसू लागल्या. साताऱ्यातील कोरोगावात पाण्याचा प्रश्न भीषण होता. योगेश यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं गाव पाणीदार करण्याचा निश्चय केला.

महाराष्ट्रात कायम पाण्याची समस्या भेडसावणारं गाव म्हणून साताऱ्यातील कोरेगावाकडे पाहिलं जातं. त्यानं काही उद्योजकांसोबत संपर्क साधला. गावात जलसंधारणाचं काम करायचं ठरवलं त्यासाठी आर्थिक मदत मिळवून वॉटर रिसोर्सचं काम सुरू केलं. त्यानंतर दहिगावाशेजारी आसनगावचा पाणीप्रश्नही सोडवण्यासाठीही पुढाकार घेतला.

योगेश यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय शिंदे यांच्या मदतीनं गावच्या शिवाराच्या पाहणी केली. गावातील सदस्यांना प्रकल्पाची माहिती सांगितली. लॉकडाऊनमुळे प्रकल्पासाठी आवश्यक असणारं साहित्य मिळण्यात मात्र अडचणी येत होत्या. परवानगी काढून मशीन उपलब्ध झाल्यानंतर पाझर तलावाकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. अनेक अडचणींचा सामना करून योगेश यांच्यासह ग्रामस्थांनी तलावाचं काम पूर्ण केलं आहे. यंदा पावसात या तलावात पाण्याचा साधा जास्त झाला तर त्याचा फायदा ग्रामस्थांना होईल अशी आशा व्यक्त केली आहे.