Home बातम्या आंतरराष्ट्रीय लॉकडाऊनमुळे कुटुंब नियोजनाचे तीनतेरा; लाखो महिलांना मनाविरुद्ध गरोदरपण

लॉकडाऊनमुळे कुटुंब नियोजनाचे तीनतेरा; लाखो महिलांना मनाविरुद्ध गरोदरपण

न्यूयॉर्क : बऱ्याच काळापासून Coronavirus कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता या परिस्थितीमध्ये बहुतांश देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. भारतासह काही राष्ट्रांमध्ये लॉकडाऊनचा हा कालावधी परिस्थितीनिहाय वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला. पण, याच परिस्थितीविषयी संसुक्त राष्ट्र संघटनेच्या एका विभागाकडून नुकतीच एका गंभीर मुद्द्यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 

सारं जग सध्या लॉकडाऊनमध्ये असतानाच UNFPA अर्थात United Nations Population Fundकडून येत्या काळात जवळपास ७० लाख महिलांना मनाविरुद्धच्या गरोदरपणाचा सामना करावा लागू शकतो ही धक्कादायक बाब समोर आणली आहे. 

लॉकडाऊनची ही परिस्थिती सहा महिन्यांपर्यंत कायम राहिल्यास ही परिस्थिती ओढावू शकते. एका निरिक्षणामतून मिळालेल्या माहितीनुसार या काळात लैंगिक छळ आणि हिंसाचाराचंही प्रमाण वाढलेलं आहे. कौटुंबीक हिंसाचाराला महिला सर्वाधिक बळी पडत आहेत, कारण शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्यांच्या सानिध्ध्यात त्यांना अधिक काळ व्यतीत करावा लागत आहे. ही परिस्थिती पाहता येत्या काळात यामध्ये आणखी मोठ्या संख्येने वाढ होण्याचीही चित्र स्पष्ट असल्याचं या निरिक्षणातून स्पष्ट झालं आहे. 

UN Population Fund’s Executive Director डॉ. नतालिया कनेम यांनी माध्यमांना नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, कोविड 19 मुळे सुरु असणाऱ्या या लॉकडाऊनच्या काळाचा जागतिक स्तरावर महिला आणि मुलींवर परिणाम होणार आहे. ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने महिलांनी केलेलं कुटुंब नियोजन, त्यांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्या शरीराची काळजी या गोष्टींकडे दुर्लक्ष होणार आहे.