Home शहरे उस्मानाबाद लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

उस्मानाबाद । प्रतिनिधी : मुंबई – पुणे यासारख्या शहरात कार्यरत मात्र लॉकडाऊनमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात अडकून राहिलेल्या कामगारांना आपल्या जिल्ह्यातच काम (रोजगार) उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने नोंदणीसाठी ऑनलाईन फॉर्म भरून घेतला जात आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी “tweeter”द्वारे केले आहे.

मंगळावर ५ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हाधिकारी यांनी “tweet”केले आहे. त्यात संबंधित कामगारांनी आपल्या ईमेलसह, नाव, लिंग, पत्ता, आधार क्रमांक असे पंधरा फिल्ड भरावयाच्या आहेत. मात्र ही कोणत्याही प्रकारची जॉब हमी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याची संबंधित लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfu06UbsNVu0Fzaif8xHnCfQqE3atkNtjb7lloPtjalgjY-tw/viewform ही आहे.

दरम्यान लॉकडाऊन काळात जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांना काम (रोजगार) मिळवून देण्याच्या प्रशासनाच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.