लॉकडाऊन : अंत्यविधीस केली गर्दी अडीचशे लोकां विरुद्ध गुन्हा नोंद

- Advertisement -

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २५ मे : रविवारी २४ मे रोजी दुचाकी घसरून पडल्याने गंभीर जखमी पारधी समाजातील एकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधिसाठी सहभागी शेकडो लोकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे भादंविचे कलम १८८, २६९, २७०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारधी समाजातील युवक मच्छिन्द्र कारकून काळे यांचे पार्थिवावर येथील डीएड कॉलेज जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अडीचशे ते तीनशे लोक यात सहभागी झाले होते. या सर्वांवर आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -