Home शहरे उस्मानाबाद लॉकडाऊन कारवाई : सहा WANTED गजाआड

लॉकडाऊन कारवाई : सहा WANTED गजाआड

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ४ जून : उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलीस ठाणे, वाशी येथील पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असलेले सहा Wanted आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी अवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ही कारवाई केली आहे.

आनंदनगर पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी समीरउद्दीन काझी उर्फ मुझम्मील हा मागील दोन वर्षापासून पोलीसांना पाहिजे (Wanted) होता. वाशी पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कृष्णा आण्णासाहेब देशमुख, दादासाहेब उध्दव हुंबे व एक अल्पवयीन युवक (विधी संघर्ष ग्रस्त) यांसह आनंदनगर पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जिशान रहिम शेख, अरबाज जहांगीर शेख दोघे रा. शालीमार हॉटेल मागे, उस्मानाबाद अशा सहा आरोपींस स्थागुशा च्या पथकाने गुरुवारी ४ जून रोजी गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकानांहुन ताब्यात घेतले आहेत. उर्वरीत तपासकामी संबंधीत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उप निरीक्षक पांडुरंग माने, सहायक पोलीस फौजदार मधुकर घायाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत झोंबाडे, किसन जगताप, प्रमोद थोरात, तानाजी माळी, पोलीस नाईक समाधान वाघमारे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अमोल कावरे, संतोष गव्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश मारलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.