Home गुन्हा लॉकडाऊन काळात वाढदीवस साजरा गुन्हे दाखल

लॉकडाऊन काळात वाढदीवस साजरा गुन्हे दाखल

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ११ जून : लॉकडाऊन काळात सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टन्सिंगसह अनेक अनेक नियम आणि सूचनांचे पालन करने आवश्यक आहे. माणसे एकत्र जमतील अशे कार्यक्रम करणे हा गुन्हा आहे. तरीही वाढदिवस एक इव्हेंट म्हणून साजरा करणाऱ्या लोकांवर जिल्ह्यात ठीक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यतील कळंब शहरात बुधवारी १० जून रोजी रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक जागी अवैधपणे तलवार बाळगून रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करुन वाढदिवस साजरा करण्याच्या दोन घटना घडल्या. कळंब येथील मोमीन गल्लीतील वसीम मुर्तजा शेख याने  बागवान चौकात वाढदिवस साजरा केला. अवैधपणे तलवार बाळगली.

दुसऱ्या घटनेत कळंब येथील कल्पना नगरचा महेबुब मोहंमद शेख, अझर मोमीन यांनी गांधीनगरात सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून सर्फराज मोमीन उर्फ शफिक याचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा केला.

यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्यांच्यावर भा.दं.वि. कलम १८८ सह, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २ सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) अन्वये स्वतंत्र दोन गुन्हे कळंब पोलीस ठाण्यात नोंदवले आहेत.