पिंपरी चिंचवड ,पुणे :-रमेश कांबळे
लॉक डाऊनच्या काळात पिंपरी शहरात एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आवळल्या आहेत.मागील आठवड्यात मोटारीच्या साहाय्याने एटीएम ला दोर बांधून एटीएम फोडले होते. त्यात ५ लाख रुपया पेक्षा अधिक रक्कम होती. मात्र, १०० सीसीटीव्ही आणि दीडशे पेक्षा अधिक गुन्हेगारांची चौकशी करत आरोपीना जेरबंद करण्यात गुन्हे शाखाला यश आलेय.या घटनेत अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी, शेऱ्या विनोद धोत्रे, यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून १ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त केलीये.
दरम्यान, एटीएम हे मुळा-मुठा नदीच्या पात्रात, फेकून देण्यात आले होते. तर
युनिट १ च्या पोलिसांनी केलेल्या तपासात हडपसर मध्ये आरोपींचे निश्चित ठिकाण समजले आणि तीन दिवस ट्रॅप लावून त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून अद्याप दोन गुन्हेगार फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत