Home बातम्या ऐतिहासिक लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या जनकल्याणकारी योजनांच्या जागरला प्रारंभ – महासंवाद

लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या जनकल्याणकारी योजनांच्या जागरला प्रारंभ – महासंवाद

0
लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या जनकल्याणकारी योजनांच्या जागरला प्रारंभ – महासंवाद

गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर,दि.9 (जिमाका): विद्यमान महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्ह्यात लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. या जागर कार्यक्रमाला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 ‘दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची’ या घोषवाक्यासह जिल्ह्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जागर मोहीम कलापथकांच्या माध्यमातून आजपासून सुरू केली आहे.

बुधवारी शाहीर सुभाष गोरे यांच्या जय भवानी कलापथक सांस्कृतिक मंडळ, जवळा, ता.सांगोला या कलापथकाने मोहोळ तालुक्यातील तीन गावात जनजागृती केली. पेनूरमध्ये उपसरपंच श्री. चवरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. पाटकूलमध्ये सरपंच शिवाजी भोसले यांच्या हस्ते उद्घाटनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने केलेली कामे, राबविलेल्या योजना यांची माहिती जनतेला करून देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी जगताप, राजू लोंढे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. टाकळी सिकंदरमध्येही जनजागृती करण्यात आली.

पंढरपूर येथील विजयकुमार व्यवहारे यांच्या भैरव मार्तंड जागरण गोंधळ व सांस्कृतिक कलामंचने तालुक्यातील तुंगत, सरकोली आणि चळे या गावात जनजागृती केली. तुंगतमध्ये सरपंच श्री. रणदिवे यांनी उद्घाटन केले तर सरकोलीमध्ये सरपंच शिवाजी दगडू भोसले यांच्या हस्ते कार्यक्रमाला प्रारंभ झाला. चळेमध्ये सरपंच श्रीमती मोरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. तिन्ही गावामध्ये ग्रामस्थांनी महाविकास आघाडी शासनाने दोन वर्षात विविध जनकल्याणकारी निर्णय घेतल्याबाबत सरकारचे धन्यवाद मानले.

महात्मा फुले ग्रामीण विकास संस्थेच्या दत्तात्रय येडवे आणि श्री. बिदरकर यांच्या कलापथकाने महूद येथे योजनांची जनजागृती केली. कार्यक्रमाला माजी सरपंच दौलतराव कांबळे, ग्रामविकास अधिकारी शंकरराव मेटकरी, ग्रामसेवक बाळू शिंदे यांच्यासह प्रतिष्ठित नागरकि, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री कोळे आणि चोपडी गावात जनजागृतीचा कार्यक्रम झाला. शासनाने कोरोना लसीकरण करून नागरिकांच्या जीविताची देखभाल घेतली. शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, पीक विमा आणि आपत्तीच्या काळात मदतीचा हात दिला. याबाबत जनजागृती करण्यात आली.

17 मार्चपर्यंत जनजागृती करण्यात येणार असल्याने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000