Home शहरे अकोला लोककलेच्या माध्यमातून विकास कामांच्या जागरास ठाणे जिल्ह्यात सुरुवात – महासंवाद

लोककलेच्या माध्यमातून विकास कामांच्या जागरास ठाणे जिल्ह्यात सुरुवात – महासंवाद

0
लोककलेच्या माध्यमातून विकास कामांच्या जागरास ठाणे जिल्ह्यात सुरुवात – महासंवाद

ठाणेदि. 9 (जिमाका) : दोन वर्षे जनसेवेची ही संकल्पना घेऊन गेल्या दोन वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती लोककलेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचविण्यासाठीच्या मोहिमेस ठाणे जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत निवडलेल्या कलापथकांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सादरीकरण करून लोकांचे लक्ष वेधून घेतले.

महाविकास आघाडी शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोककलेच्या माध्यमातून विकास कामांचा जागर करण्यात येत आहे.   #दोनवर्षेजनसेवेचीमहाविकासआघाडीची या टॅग लाईनसह  ही मोहीम सुरु आहे.  गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने स्वीकारलेली धोरणेघेतलेले निर्णयकेलेल्या कार्याची माहिती याद्वारे ठाणे जिल्ह्यातील विविध भागात पोचविण्यात येत आहे.

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या मोहिमेसाठी जिल्ह्यात तीन कलापथकांची निवड केली आहे. याद्वारे गेल्या दोन वर्षात झालेली विकास कामेकोरोना काळात घेतलेली काळजीवाढविलेल्या आरोग्य सुविधापायाभूत सुविधा यांची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यात येत आहे.

ठाणे मधील बाळकुमखारेगाव व माजिवाडा येथे तर कल्याणमधील तहसीलदार कार्यालय आवारशहापूर  तालुक्यातील वाशिंद येथे विविध कलापथकांनी सादरीकरण केले.

कलापथकांच्या वाद्याच्या आवाजाने आणि तरुण कलाकारांच्या सादरीकरणाने जमलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या सादरीकरणास नागरिकांनी या वाद्याच्या तालावर ठेका धरल्याचे दिसून आले.

 0000