मुंबई दि. 10 : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मुंबई येथे विनम्र अभिवादन केले.
‘सुरुची’ या शासकीय निवासस्थानी श्री.देसाई यांनी बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
बाळासाहेबांनी आपल्यापुढे आदर्श नेतृत्वाचा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यांनी रुजवलेल्या सामाजिक बांधिलकीच्या मार्गावरून वाटचाल सुरू ठेवण्याचा आमचा कायम प्रयत्न राहिला आहे. यापुढेही त्या वाटेवरून दृढपणे चालत राहू, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी अभिवादनात म्हटले आहे.
0000
- Advertisement -