Home ताज्या बातम्या लोकल रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीच्या मृत्यू

लोकल रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीच्या मृत्यू

0

लोकल रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीच्या मृत्यू

लोकल रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीच्या मृत्यू झाला. ही घटना 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ बीजलीनगर येथे घडली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावर लोकलच्या धडकेत रेल्वे रुळ ओलांडणा-या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

मयत व्यतीची अद्याप ओळख पटली नाही. वय अंदाजे 30 वर्ष असून रंग काळा आहे. उंची पाच फूट चार इंच, काळ्या रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट घातली आहे. हातावर ‘सुनीता’ असे कोरलेले आहे.