लोणावळ्यात मुसळधार, लोणावळा धरण ओव्हर फ्लो, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

- Advertisement -

पुणे-परवेज शेख
लोणावळा – लोणावळ्यात आज सकाळी 384 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. टाटांच्या लोणावळा धरणातून पाण्याचा अनियंत्रित विसर्ग सुरू झाल्याने हुडको, निसर्ग नगरी, भांगरवाडी, नांगरगाव, वळवण भागातील रहिवाशांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने लोणावळा नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नगरपरिषद आपत्कालीन कक्ष, आयएनएस शिवाजी, शिवदुर्ग मित्र, पोलिस तसेच स्वयंसेवी संस्थेची मदत पथके तैनात करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येथील हुडको, नांगरगाव भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश देण्यात आले आहे

- Advertisement -