Home ताज्या बातम्या वडाळा ; पोलिस बोलेरो गाडीचा टायर फुटल्याने अपघात

वडाळा ; पोलिस बोलेरो गाडीचा टायर फुटल्याने अपघात

मुंबई :- शफीक शेख, वडाळा पोलीस ठाणे

दि. 30/05/2020 रोजी दुपारी 14:00 वा.चे सुमारास ठाणे लोहमार्ग, पोलीस ठाणे येथील पोलीस पथक हे भायखळा जेल येथे महिलाआरोपीचा ताबा घेऊन पुन्हा ठाणे येथे बोलेरो शासकीय वाहन क्र. MH-05-P-130 ने जात असताना पोल क्र. 276, 277, 278 चे मध्ये, फ्री वे, नॉर्थ बॉण्ड, मुंबई या ठिकाणी बोलेरो या गाडीचा पुढील बाजूचा उजवा टायर फुटल्यामुळे सदरची गाडी डिव्हायडरला धडकून ड्रायव्हर कडील बाजूस पडल्याने या गाडीचे वाहन चालक पो.शिपाई क्र.2839 श्री. केडया वसावे, वय 30 वर्षे, रा.ठी. शिववैभव, को.ओ. हौ. सोसायटी, काटेमानवली, कल्याण पूर्व, जि. ठाणे हे गंभीर जखमी झाले. तसेच गाडीतील 1) पो.ह. 907 श्री. काळे 2) म.पो.ना. 2304 श्रीमती गांगवे 3) म.पो.शि. 2833 श्रीमती शनागर 4) महिला आरोपी यास्मिन पाशा शेख हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जे. जे. हॉस्पिटल येथे नेले असता वाहन चालक श्री. वसावे यांना आंतररुग्ण म्हणून दाखल केले असून इतर किरकोळ जखमींना औषधोपचार करून सोडणार आहेत.

सदर बाबत टी.ए.डी. दाखल करणार आहेत.