हायलाइट्स:
- नीना यांच्या वडिलांनी घरातल्यांची इच्छा म्हणून केलं होतं दुसरं लग्न
- वडिलांच्या दुसऱ्या लग्नाने नीना यांच्या आईला बसला होता धक्का
- नीना यांच्या आईने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
कमी वयात झालं होतं नीना गुप्तांचं पहिलं लग्न, का झाला घटस्फोट
आपल्या वडिलांबद्दल नीना यांनी लिहिलं, ‘त्यांनी एका अशा मुलीसोबत लग्न केलं होतं जी दुसऱ्या जातीची होती. माझी आई शकुंतला गुप्ता ही पंजाबी कुटुंबातील साधी मुलगी होती. त्यांनी प्रेमविवाह केला होता. माझ्या वडिलांनी त्या मुलीशी लग्न केलं जिच्यावर त्यांचं प्रेम होतं आणि एक चांगला मुलगा म्हणून त्यांनी त्यांच्या घरच्यांनी ठरवलेल्या मुलीसोबतही लग्न केलं होतं. त्यांच्या घरातल्यांना माझ्या आईसोबतच लग्न मान्य नसल्याने त्यांनी वडिलांना त्यांच्या जातीमधील एका मुलीशी विवाह करायला सांगितला आणि त्यांनी तो केला देखील. वडिलांकडून झालेल्या फसवणुकीमुळे माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.’
वडिलांचं घरातील वागणं सांगत नीना यांनी लिहिलं, ‘वडिलांकडून झालेल्या या फसवणुकीनंतर माझी आई आतून तुटली होती. तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मला या गोष्टीची जाणीव व्हायला लागली की, माझे वडील रात्रीच्या जेवणानंतर घरी नसायचे. ते सकाळी नाश्ता करायला देखील आमच्यासोबत नसायचे. ते यायचे आणि कपडे बदलून ऑफिसला निघून जायचे. मी माझ्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीला काकू म्हणून हाक मारायचे. ते दोन्ही कुटुंबांना सावरायचा प्रयत्न करायचे पण त्याचा फार काही उपयोग होत नव्हता. जोपर्यंत मी लहान होते तोपर्यंत मी या गाष्टींमध्ये लक्ष दिलं नाही पण जेव्हा मी मोठी झाले तेव्हा सगळं चित्र स्पष्ट कळू लागलं.’
न्यूयॉर्क येथील महोत्सवात मकरंद अनासपुरे दिग्दर्शित सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा बहुमान