Home अश्रेणीबद्ध वडिलांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘ती’ 77 तास जागली, अन्…

वडिलांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘ती’ 77 तास जागली, अन्…

0

चिंचवड : खरंतरं मुलगी ही वडिलांच्या खूप जवळ असते असं बोललं जातं. याचीच प्रचिती चिंचवड शहरात आली आहे. चिंचवड गावातील श्रुती गणेश गावडे हिने तब्बल 77 तास जागून अमिताभ बच्चन ह्यांच्या 77 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ यांच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे सुक्ष्म अक्षरात लिहून ही सारी चित्रे श्रुतीने काढली आहेत. 

श्रुतीचे वडील हे अमिताभ बच्चनचे फार मोठे फॅन होते आणि त्यांचे चित्र साकारावे अशी त्यांची फार इच्छा होती, 4 महिन्यांपूर्वी  तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले पण अमिताभ बच्चन ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंशुल क्रिएशनच्या माध्यमातून तब्बल 77 चित्रांचे प्रदर्शन घडवून तिने तिच्या वडिलांची इच्छा पूर्ण केली. 

अक्षरमुद्रणातून चितारलेल्या या चित्रांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे आहेत. हे प्रदर्शन 11 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर, सकाळी 11 ते रात्री 9 ह्या वेळेत रामकृष्ण मोरे कलादालन, चिंचवड येथे विनामूल्य सुरु आहे.