Home शहरे अहमदनगर वधु- वर परिचय मेळावा अहमदनगर पॅटर्न राज्यात लोकप्रिय, १ मार्चला वाघोली शहरात राज्यस्तरीय मराठा वधु-वर परिचय महामेळावा

वधु- वर परिचय मेळावा अहमदनगर पॅटर्न राज्यात लोकप्रिय, १ मार्चला वाघोली शहरात राज्यस्तरीय मराठा वधु-वर परिचय महामेळावा

0

नेवासा ,प्रतिनिधी : ज्येष्ठ नागरिक संघ वाघोली ता. हवेली आयोजित, राज्यस्तरीय मराठा वधू-वरांचा थेट-भेट परिचय महामेळावा रविवार दिनांक १ मार्च सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत या वेळेत वाघोली शहरातील वाघेश्वर पॅलेस मंगल कार्यालय नगर- पुणे महामार्ग, वाघोली ता. हवेली येथे होत असल्याची माहिती,मेळाव्याचे संयोजक बाळासाहेब सातव ,विठ्ठलराव गुंजाळ यांनी दिली या मेळाव्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अॅड.अशोकबापु पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असुन आमदार सुनिल टिंगरे,सभापती पंढरीनाथ पठारे,वाघोलीचे सरपंच सौ.वसुंधराताई उबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असे मेळाव्याचे संयोजक डाॅ.उषा मोरे म्हणाले या लग्नसराईत शेवटचा राज्यस्तरीय मराठा वधू-वर परिचय महामेळावा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे वाघेश्वर पॅलेस मंगल कार्यालयात होत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या इच्छा प्रमाणे जोडीदार शोधता येतो या मेळाव्यात नोकरीच्या निमित्ताने पुणे शहर व परिसरात स्थायिक होऊ इच्छित आसलेल्या सर्व जिल्ह्यातील वधू-वर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात अनुरूप वधूवरांना त्यांची ओळख, माहिती सांगून जोडीदाराबद्दल असणाऱ्या अपेक्षा व्यक्त करता येणार आहेत तसेच मराठा समाजाच्या उपवर वधू वरांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोरदार निवडता येणार असून या मेळाव्यात वधूवरांनी स्वतःचा फोटो व बायोडाटा पालकांनी हजर राहावे आईवडिलांनी एकटे येऊ नये असे आवाहन अहमदनगर येथील राजमाता जिजाऊ मराठा वधू-वर मंडळाचे मार्गदर्शक व मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री विठ्ठलराव गुंजाळ, जयकिसन वाघ, डाॅ.अभिमन्यू कोठुळे,डाॅ. गजानन पडघन,डाॅ. सतिश आळंदकर धनंजय सांबारे, बाळासाहेब कोळगे, व्यंकटेश बोडखे वसंतराव मुठे, आसाराम नलगे, अशोकराव ढोले, अशोकराव बनकर, बाळासाहेब भोर,आदींनी केले आहे.
□अहमदनगर शहरातून सुरू झालेली राज्यस्तरीय मराठा वधु- वर थेट-भेट परीचय मेळाव्याची लोक चळवळ हि संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरले असून राज्यात लोकसहभागातून मेळाव्याची शृंखला सुरू झाली असून नुकताच राजमाता जिजाऊ मराठा वधू-वर मंडळाचा २५ व राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा २९ डिसेंबरला मोठ्या थाटात शनिशिंगणापूरता.नेवासा येथे पार पडला त्याच धर्तीवर ज्येष्ठ नागरिक संघ वाघोली आयोजित राज्यस्तरीय मराठा वधु-वर थेट भेट परिचय महामेळावा १ मार्चला वाघेश्वर पॅलेस नगर- पूना महामार्ग वाघोली ता. हवेली जि. पुणे येथे होत आहे
ज्येष्ठ नागरिक संघ वाघोली व स्थानिक समाज बांधवांच्या सहकार्यातून जय्यत तयारी मेळाव्याची सुरू आहे.