बॉलिवूडच्या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांचा आज वाढदिवस. माधुरी दीक्षितवर चित्रीत ‘धक धक करने लगा’ हे गाणे असो वा देवदासचे ‘डोला रे डोला’ हे गीत. सरोज खान यांनी कोरिओफ केलेली अशी असंख्य गाणी आहेत. पण आज त्यांच्या करिअरबद्दल नाही तर त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.सरोज खान यांचे लग्नाआधीचे नाव निर्मला किशनचंद संधु सिंग नागपाल हे होते. फाळणीनंतर त्या भारतात आल्या. वयाच्या उण्यापु-या 13 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. तेही स्वत:पेक्षा 30 वर्षे मोठ्या नृत्य दिग्दर्शकासोबत. होय, वयाच्या 13 व्या वर्षीच सरोज यांनी 41 वर्षीय बी. सोहनलाल यांच्यासोबत लग्न केले. सोहनलाल हेसुद्धा डान्सर होते. सरोज यांच्यासोबत त्यांचे हे दुसरे लग्न होते.
सोहनलाल यांनीच सरोज यांना डान्सचे प्राथमिक शिक्षण दिले. त्यांच्याकडून सरोज यांनी कथ्थक, कथकली, मणिपुरी, भरतनाट्यम शिकले.
14 व्या वर्षीच सरोज आई झाल्यात. त्यांनी राजू खान या पहिल्या मुलाला जन्म दिला. दोन वर्षांनंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. पण आठच महिन्यांत या मुलीचा मृत्यू झाला. यादरम्यान सोहनलाल यांनी सरोज यांच्याकडे विभक्त होण्याची मागणी केली. मुलांना स्वत:चे नाव देण्यासही त्यांनी नकार दिला.
विशेष म्हणजे, विभक्त झाल्यानंतर सोहनलाल यांनी सरोज यांना पुन्हा त्यांची असिस्टंट होण्याची ऑफर दिली. सरोज यांनी त्यांची ऑफर नाकारली. यामुळे संतापलेल्या सोहनलाल यांनी सरोज यांच्यावर केस ठोकली. अखेर सरोज यांना आपल्या कामाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना पुन्हा सोहनलालकडे परतावे लागले.