Home गुन्हा वर्धा जळीतकांड: तरुणीची प्रकृती नाजूक, पुढील ७ दिवस महत्त्वाचे; डॉक्टरांची माहिती

वर्धा जळीतकांड: तरुणीची प्रकृती नाजूक, पुढील ७ दिवस महत्त्वाचे; डॉक्टरांची माहिती

0

नागपूर : हिंगणघाट जळीत प्रकरणातील शिक्षिका मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृतीची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी रात्री रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत नॅशनल बर्न सेंटरचे डॉ सुनील केशवानी, ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार सोबत होते.

डॉ. केशवानी म्हणाले, तरुणीची प्रकृती फार नाजूक आहे. ती 40 टक्के जळाली आहे. 24 तास तिच्यावर डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत. पुढील 7 दिवस तिच्यासाठी महत्वाचे आहेत. तिच्या श्वसन नलिकेला व फुफ्फुसाला इजा झालेली आहे. यामुळे सध्या काही सांगता येणार नाही. परंतु नागपुरात होणाऱ्या अशा वाढत्या घटना पाहता नागपुरातही मुंबईसारखे बर्न सेंटर असावे, असेही ते म्हणाले.

फास्टट्रॅक कोर्टमध्ये प्रकरण चालवणार
आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी तिच्या वडिलांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे ही केस सुपूर्द केली जाईल. सोबतच लवकरात लवकर निकाल लागण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवण्याचा प्रयत्न केला जाईल. पीडित तरुणीच्या आरोग्याचा पूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. अशा घटना होऊ नये यासाठी आंध्र प्रदेशातील कायदा महाराष्ट्रात लागू करण्यावर अभ्यास केला जाईल, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले.