वर्ध्याने आपला महान सुपुत्र गमावला – महासंवाद

वर्ध्याने आपला महान सुपुत्र गमावला – महासंवाद
- Advertisement -

वर्धा, दि.13 : राहुल बजाज यांच्या जाण्याने वर्ध्याने आपला एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात पालकमंत्री सुनील केदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बजाज कुटुंबिय वर्धा येथील असल्याचे आपल्याला सार्थ अभिमान आहे. राहुल बजाज यांचे लहानपण वर्धा येथेच गेले. बरेचदा ते कुटुंबियांसह बजाजवाडी येथे येत असत. वर्धा शहर आणि जिल्ह्याबद्दल त्यांना विशेष आस्था आणि आपुलकी होती. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगली शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी विविध अभ्यासक्रमाची महाविद्यालये वर्धा येथे सुरु केली.

बजाज उद्योग समुहाची धुरा त्यांनी हाती घेतल्यानंतर समुहाला त्यांनी यशाच्या शिखरावर नेले. उच्च शिक्षित आणि मोठ्या उद्योग समुहाचे सर्वेसर्वा असून देखिल त्यांची राहणी अतिशय साधी होती. ते स्पष्टवक्ता होते. आपली मते ते निर्भयपणे व्यक्त करत. आपल्या राहणीमानातून कायम गांधी विचारांची जोपासना त्यांनी केली, असे आपल्या भावना व्यक्त करतांना पालकमंत्री सुनील केदार त्यांनी सांगितले.

0000

- Advertisement -