वसंतराव नाईक महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

वसंतराव नाईक महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
- Advertisement -


मुंबई, दि. २१ : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संदीप शिवराम चव्हाण यांनी केले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महामंडळास वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, बीज भांडवल कर्ज योजना आणि एक लाख रुपये थेट कर्ज योजना या योजनांची उद्दिष्टे महामंडळाच्या मुख्यालयाकडून प्राप्त झाली आहेत. पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी vnvjntdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

याशिवाय महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) लोहार समाजासाठी ब्रह्मलीन आचार्य पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) आणि नाथपंथी समाजासाठी श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या सहा महामंडळांची स्थापना केली असून, ही सर्व महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत आहेत. या महामंडळांच्या योजनांसाठीही मुख्यालयाकडून उद्दिष्टे प्राप्त झाली आहेत.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा कार्यालय, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), गृहनिर्माण भवन, खोली क्रमांक ३३, तळमजला, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई–४०००५१ येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-३१८९७३०३ वर संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 



Source link

- Advertisement -