वसई : वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणजे पुरातन वसईचा नरवीर रणवीर चिमाजी अप्पाचा किल्ला परंतु,या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली असून या भागात बेकायदेशीर बांधकामांनी बऱ्यापैकी आपले डोके वर काढले आहे. दरम्यान या तक्र ारी ची दखल घेऊन आता येथील केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने कंबर कसली असून येथे अनिधकृत बांधकाम करणाऱ्यां विरोधात वसई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वसईच्या किल्ल्याला दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी हौशी पर्यटक, ट्रेकर्स, इतिहासकार, जाणकार व किल्लेप्रेमी भेटी देत असतात.एका बाजूला असलेली वसई- नायगाव ची खाडी तर दुस-या बाजूला स्थानिक कोळी बांधवांची गावे त्यामुळे येथे पर्यटकांची सतत रेलचेल असते. मात्र या वसई किल्ल्यात सध्या अनिधकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे.
एकूणच वसई किल्ल्याच्या संरिक्षत क्षेत्रा मधील तटबंदीच्या आत तीन व्यक्तींनी व किल्ल्याच्या तटबंदी बाहेर १०० मीटरच्या आत कस्टम कार्यालया जवळ अनिधकृत बांधकाम केले आहे. पुरातत्व विभागाने त्या विरोधात पोलिसांत सहा जणांवर गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये वर्षा डवले, सुनीता कदम, गुरु दत्त डवले, हेमा तुमडे, गडसन धोकडू आण िमोसेज इवा अशी आरोपींची नावे असून त्यांनी कस्टम कार्यालया जवळ तसेच किल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ आण िकिल्लाबंदर वसई येथे बांधकाम केल्याचे पुरातत्व विभागाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी प्राचीन स्मारक व पुरातत्वीय स्थळे तथा अवशेष नुसार गुन्हे नोंद केल्याचे पोलिस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी सांगितले.
वसई किल्ल्यात झालेल्या अनिधकृत बांधकामांबद्दल वेळोवेळी पुरातत्व विभागाला कळविले असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने या अनिधकृत बांधकाम करणाºयां विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच किल्ल्यात इतर ठिकाणी झालेल्या अनिधकृत बांधकामांवर देखील कारवाई करण्यात यावी आणि ती देखील भुईसपाट करावी जेणेकरून किल्ल्याला लागलेले गालबोट नाहीसे, होईल अशी आम्हा इतिहास अभ्यासकांची मागणी राहिली आहे.