Home बातम्या ऐतिहासिक वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

0
वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. 19 :- वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

विधानभवन येथील दालनात झालेल्या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंतआमदार महेंद्र दळवीजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरकोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकररायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वांद्रे लघु पाटबंधारे योजना ही रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वांद्रे गावाजवळ  नाल्यावर प्रस्तावित आहे. वांद्रे लघु पाटबंधारे योजनेचे पाणलोट क्षेत्र 7.818 चौ. कि. मी. असून उपयुक्त पाणीसाठा 10.549 द.ल.घ.मी. आहे. योजनेअंतर्गत एकूण 667 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी 13 कि.मी. व 11 कि.मी. लांबीचा अनुक्रमे उजवा व डावा कालवा प्रस्तावित करण्यात आला आहे. परिसरामध्ये पाणी उपलब्धतेमुळे आंबा व नारळाच्या क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात वाढ होण्यास मदत होईल. या योजनेमुळे वांद्रे परिसरातील खेड्यांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या धरणमुळे माझगावनांदगावधांडपांगलीअदीखार्दोकुलेखारिकवाडाआरवघरवालवतीचिखलदआंबिस्तेउसरोलीकाशिदवेळास्तेविहूर आणि मनोर या १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासही मदत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रकल्पाचा प्रस्ताव प्रशासकिय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

—-000—-

केशव करंदीकर/विसंअ/