Home शहरे अकोला वाघाची शिकार करणार्‍या ६ जणांना अटक

वाघाची शिकार करणार्‍या ६ जणांना अटक

भंडारा : शेतात वीजेचा करंट लावून वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वनविभागाने धाड टाकून अटक केली. ही कारवाई तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे करण्यात आली. याप्रकरणी मनिराम आनंदराम गंगबोयर, शिव मदन कुंभरे, रोहित नरसिंग भत्ता, विजय सुंदरलाल पारधी, रवींद्र किसन रहांगडाले व चमरू ताराचंद कोहळे यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून वाघाचे कातडे, २२ वाघनखे आणि चितळाचे सात शिंग जप्त करण्यात आले आहे. नाकाडोंगरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील मनिराम गंगबोयर याच्या घराची झडती घेतली. त्या वेळी तेथे आक्षेपार्ह गोष्टी आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला.