पुणे : परवेज शेख वानवडी पोलीस ठाणे तपास पथकाचे कर्मचारी पो.शि. नवनाथ खताळ, व पो.शि.नासीर देशमुख यांना दि. २३ जुलै रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली, एक ग्रे रंगाची पल्सर २२० मोटार सायकल असुन ती चोरीची असल्याचा संशय आहे. अशी बातमी मिळाल्याने तात्काळ त्या ठिकाणी जावुन त्यांनी बजाज पल्सर २२० क्रमांक MH-12/GY/150 ताब्यात घेवुन, त्या व्यक्तीस त्याचे नाव पत्ता विचारता अजय रणछोड उर्फ राजु खरे वय २० वर्षे रा.काळेपड रेल्वे गेट जवळ म्हसोबा मंदीरा शेजारी गल्ली नंबर १ हडपसर पुणे मुळ गाव मु.पो. ओझर ता.गंगापुर जि. औरंगाबाद असे असल्याचे सांगीतले असुन त्यास मोटार सायकलबाबत अधिक विचारणा केली असता त्याने सदरची मो.सा.ही याचा साथीदार साहोल इनामदार रा.आदर्शनगर जे.एस. पी. एम. कॉलेजच्या मागे याच्या सोबत चोरी केल्याचे कबुल करुन तसे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरबाबत वानवडी पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याचेकडुन एकुण ३८ मोबाईल व दोन मोटार सायकल असा एकुण ३,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही, श्री. सुनिल फुलारी साो, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग, पुणे शहर, श्री. सुहास बावचे साो, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर, श्री. सुनिल देशमुख, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर (अतिरिक्त कार्यभार वानवडी विभाग) श्री. क्रांतीकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरिक्षक श्री. रविंद्र गायकवाड, सहा.पो. फौज.रमेश भोसले, पो.हवा.राजु सासगे, पो.ना.योगेश गायकवाड, पो.ना.संभाजी दिवेकर, पो.शि.सुधीर सोनवणे, पो.शि.प्रतिक लाहिगुडे, पो.शि.महेश कांब
वानवडी पोलीसांनी सराईत गुन्हेगारास पकडून त्यांच्या कडून ३८ मोबाईल व दोन मोटार सायकली जप्त
- Advertisement -