दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख
पुणे, दि. २१ जुलै : वानवडी, हडपसर भागातून वाहनांची चोरी
करणाऱ्या चोरांना वानवडी पोलिसांनी शिताफीने पकडले.
मिळालेल्या माहितीवरून, वानवडी पोलीस चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत
असताना वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून व
रेकॉर्डवरील चेन चोरी करणारे गुन्हेगार यांचे फोटो व सीसीटीव्ही फुटेज
फिर्यादी यांना दाखवत असताना त्यांनी गुन्हेगार ओमकार मासाळ याला
ओळखले. त्यावरून वानवडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील
पोलीस शिपाई नवनाथ खताळ व सुधीर सोनवणे यांना त्यांच्या
बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्हेगार १) ओमकार मासाळ,
वय-१ वर्ष, रा . काळेपडळ, हडपसर, पुणे २) सोन्या उर्फ संजय हरिष
भोसले, वय २१ वर्ष, रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे ३) अनंत मनोज
भडकवाड, वय २१ वर्ष, रा. हिंगणे मळा, हडपसर, पुणे ४) चेतन ढेबे,
रा .सिंहगड रोड (पाहिजे आरोपी) हे काळेपडळ भागातील नवीन सासवड
रोड स्टेशन या ठिकाणी थांबले आहेत, अशी माहिती मिळाल्याने लागलीच
वानवडी तपास पथकातील कर्मचारी पोशि नासिर देशमुख, महेश कांबळे,
नवनाथ खताळ, सुधीर सोनवणे, संभाजी देविकर यांनी नियोजनबद्ध
सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण अधिक
चौकशी केली असता त्यांच्याकडून वानवडी पोलीस स्टेशनमध्ये १,
हडपसरमध्ये ३ व लोणीकाळभोरमध्ये १ असे एकूण ६ गुन्हे उघड करण्यात
आले आहेत.
सदर आरोपींकडून ५ दुचाकी वाहने, १ लोखंडी धारधार कोयता, १ बॅटरी
असा एकूण २,८०,१००/- रु. किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. सुनील फुलारी सो, अपर पोलीस आयुक्त
पू.प्रा.वि. पुणे, मा. श्री सुहास बावचे सो., पोलीस उपआयुक्त परिमंडळ
०५, श्री. सुनील कलगुटकर सो, सहायक पोलीस आयुक्त वानवडी व
पो.निरी. क्रांतीकुमार पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो.निरी.
आसाराम शेटे, पो.उप अंकुश डोंबाळे, पो. हवा.राजू राजगे, आनंद पाटोळे,
पो.ना. संभाजी देविकर, योगेश गायकवाड, पोलीस शिपाई नासिर देशमुख,
नवनाथ खताळ, सुधीर सोनवणे, अनुप सांगळे, महेश कांबळे,
जगदाळे यांच्या पथकाने केली.