Home अश्रेणीबद्ध वाहनांची तोडफोड करण्या-या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई

वाहनांची तोडफोड करण्या-या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई

0

पुणे : परवेज शेख
फरासखाना पोलीस स्टेशनचे हद्दीत राहणारा गुन्हेगार इसम प्रविण ऊर्फ भैय्या प्रताप शिंदे, वय २२ वर्षे, रा.८८६, कसबा पेठ, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह फरासखाना, विश्रामबाग, समर्थ पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोयता, लोखंडी बार, लाकडी काठी, चाकू यासारखी जीवघेणी हत्यारे बाळगुन खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी मागणे, दंगा, वाहने जाळणे, घरात प्रवेश करणे, धमकाविणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याची गुन्हेगारी कृत्ये सन २०१६ पासून चालू आहेत. त्याचेविरूध्द ०७ गुन्हे दाखल आहेत. त्याचेविरूध्द प्रतिबंधक कारवाई करण्यात येवून सुध्दा त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम होत नसलेचे दिसून आले होते. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. नावंदे, नेमणूक फरासखाना पो. स्टे. यांनी एमपीडीए कायदयान्वये नमुद इसमास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे सादर केला होता. डॉ.के.व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचेविरुध्द नुकतेच एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्दचे आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करुन ठेवण्यात आले आहे.

डॉ.के.व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी सक्रीय व दहशत निर्माण करणा-या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असुन त्यानुसार सन २०१९ सालात १३
गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले असून चालु सालात देखील सदरचे धोरण पुढे चालू ठेवून अशा गुन्हेगारांचेविरुध्द एमपीडीए अन्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात येणार आहे.