वाहने चोरणाऱ्याला खडक पोलिसांनी अटक केली

- Advertisement -

पुणे : परवेज शेख

खडक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अल्पेश शरीफ मुलाणी (२३, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाहन चोरी करणारा मुलाणी बाबत पोलिस कर्मचारी समीर माळवदकर आणि संदीप कांबळे यांना माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, निरीक्षक (गुन्हे) उत्तमराव चक्रे, सहाय्यक निरीक्षक उमाजी राठोड, कर्मचारी विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, प्रमोद नेवसे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, संदीप कांबळे, रवी लोखंडे, विशाल जाधव, रोहन खरे, इमरान नदाफ आणि सागर केकान यांच्या पथकाने आरोपीला सापळा रचुन अटक केली.७ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.३ लाख १० हजार रूपये किमतीची ७ वाहने जप्त करण्यात आली आहेत

- Advertisement -