Home गुन्हा वाहन चोरी, घरफोड्या करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांसह तिघांना अटक, अल्पवयीन मुलगा ताब्यात हडपसर पोलिसांची उत्तम कारवाई

वाहन चोरी, घरफोड्या करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांसह तिघांना अटक, अल्पवयीन मुलगा ताब्यात हडपसर पोलिसांची उत्तम कारवाई

0

वाहन चोरी, घरफोड्या करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांसह तिघांना अटक, अल्पवयीन मुलगा ताब्यात हडपसर पोलिसांची उत्तम कारवाई
पुणे : परवेज शेख

विविध पोलीस ठाण्याच्या हदीतील घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांसह तिघांना अटक करण्यात आली. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून कारवाईदरम्यान 6 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. हे आरोपी हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होणार असल्याची माहिती हडपस पोलिसांनी माहिती दिली.
पुणे शहरात वाहन चोरी, घरफोड्यांच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आरोपींचा शोध सुरू असताना हडपसर पोलिसांना सराईत गुन्हेगारांची माहिती मिळाली, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील भेकराई जकात नाका, फुरसुगी येथे सापळा लावून सन्नीसिंग पापासिंग दुधाणी ( 19, रा. बीराजदारनगर, हडपसर), अक्षय संतोष सोनी (28, सुरक्षानगर, हडपसर), बिरजुसिंग रजपूतसिंग दुधाणी (35, रा. रामटेकडी, हडपसर) यांच्या मुसक्या आवळल्या. तसेच या आरोपींसोबत गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या अल्पवयीन मुलाला बालगृहात पाठवण्यात आले आहे.
सन्नीसिंग दुधाणी याच्याविरुद्ध पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, धुळे जिल्ह्यात एकूण 20 गुन्हे तर बिरजुसिंग दुधाणी हा पुणे शहर व धुळे जिल्ह्यात 25 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये दोघेहा मोस्ट वाॅन्टेड आरोपी असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले. तपासादरम्यान या आरोपींकडून हडपसर पोलिसांनी 6 लाख 10 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने, 2 दुचाकी व चारचाकी जप्त केली आहे.
या गुन्ह्यांची उकल अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे, परिमंडळ 5 चे उपायुक्त सुहास बावचे, हडपसर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे व पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यत पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक हिमालय जोशी व तपासी पथकातील अंमलदार नितीन मुंढे, विनोदी शिवले, अकबर शेख, प्रताप गायकवाड, शाहीद शेख, प्रशांत टोपणे आदी पोलीस पथकाने केली.