हायलाइट्स:
- सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर होतेय चर्चा
- ‘शेरशाह’ चित्रपटात सिद्धार्थनं साकारली आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका
- याआधी अभिनेता अभिषेक बच्चनने ‘LOC: कारगिल’मध्ये साकारली होती कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका
चित्रपट ‘LOC: कारगिल’मध्ये अभिनेता अभिषेक बच्चननं कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. २००३ साली रिलीज झालेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, सुनील शेट्टी, संजय दत्त या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यावेळी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. एका चाहत्यानं ‘शेरशाह’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अभिनेता अभिषेक बच्चनला उद्देशून एक ट्वीट केलं आहे. ज्यावर अभिषेक बच्चननेही कमेंट केली आहे.
‘शेरशाह’ ट्रेलरनंतर ट्वीट करताना एका युझरनं लिहिलं, ”शेरशाह’ ट्रेलर अप्रतिम आहे. सिद्धार्थ मल्होत्रानं चांगलं काम केलं आहे. वाईट वाटून घेऊ नका पण ‘LOC: कारगिल’मध्ये अभिषेक बच्चनने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका यापेक्षा उत्तम साकारली होती. खास करून ‘ये दिल मांगे मोअर, दुर्गा माता की जय’ हा डायलॉग’
चाहत्याच्या या पोस्टवर अभिषेक बच्चनने हात जोडलेला इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. अभिषेक बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो अनेकदा चाहत्यांच्या पोस्ट किंवा कमेंटला उत्तरही देतो. यावेळी त्यानं चाहत्याला रिप्लाय दिला आहे. चित्रपट ‘शेरशाह’ बद्दल बोलायचं तर यात सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या १२ ऑगस्टला अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होत आहे.