हंगामातील बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट टिझर लाँच झाल्यापासून लक्ष वेधून घेत आहे. उत्कंठावर्धक टिझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कुतूहल जागविले आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मेकर्सनी या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे, ज्यात सिनेमातील दोन्ही ऍक्टर्स आजवर कधीही न पाहिलेल्या रुपात दिसत आहेत, त्यामुळे ‘विक्रम वेधा’चे मेकर्स चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवार ८ सप्टेंबर रोजी सिनेप्रेमींच्या भेटीला येणार आहे.
पुष्कर आणि गायत्री यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘विक्रम वेधा’चे नवे पोस्टर या सिनेमाबाबतचे कुतूहल वाढवणारे आहे. पोस्टरमध्ये पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांना एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. या सिनेमात भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे पोस्टरवरून जाणवते. पोस्टरवर गन हातात घेतलेला हृतिक स्लाइडिंग पोजिशनमध्ये आणि दुसरीकडे पोलिसी रुपात किलिंग एक्सप्रेशन्स देत शुटिंग पोजिशनमध्ये सैफ दिसतो. पोस्टरवर ट्रेलरची रिलीज डेटही घोषित करण्यात आली आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत, त्यामुळे नवे पोस्टर लक्षवेधी असून हृतिक आणि सैफ यांच्या चाहत्यांच्या मनात उत्साह वाढवणारे आहे.
‘विक्रम वेधा’ची प्रस्तुती गुलशन कुमार, टी-सिरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने फ्रायडे फिल्मवर्क, जिओ स्टुडिओज आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनने केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, भूषण कुमार, एस. शशिकांत आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केली आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभर रिलीज होणार आहे.