‘विचारांच्या लढाईत काही वेळा पूर्ण एकटा पडलो होतो’; राहुल गांधींचा राजीनामा वाचलात का?

- Advertisement -

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. यामुळे उद्विग्न झालेल्या राहुल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच नवा अध्यक्ष शोधण्यास सांगितले होते. यानंतरही कोणत्याही नेत्याने पराभवाची जबाबदारी न स्वीकारल्याने खंत व्यक्त केली होती. यावेळी देशभरातून अनेक नेत्यांनी राजीनामे पाठविले होते. आज राहुल यांनी मी काँग्रेसच्याअध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे सांगत एक पत्रच ट्विटरवर टाकले आहे. तसेच त्यांच्या अकाऊंटवरून काँग्रेस अध्यक्ष पदही काढून टाकले आहे. 


या पत्रात राहुल यांनी लिहिले आहे की, काँग्रेस पक्षासाठी काम करणे माझ्यासाठी सन्मानाचे होते. काँग्रेस पक्षाची विचारधारा नेहमी भारतासारख्या सुंदर देशाची सेवा करण्यासाठी बनलेली आहे. मी पक्षाच्या अध्यक्षांच्या रुपाने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. पक्षाला भविष्यात पुढे जाण्यासाठी या पराभवाची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. यामुळे मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

2019 च्या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी अन्य नेत्यांनीही घ्यायला हवी. अशात जर मी अध्यक्ष या नात्याने जबाबदारी स्वीकारली नाही आणि दुसऱ्यांनाच जबाबदार ठरवले तर ते चुकीचे ठरेल. काही सहकाऱ्यांनी सांगितले की, तुम्हीच नव्या अध्यक्षाचे नाव निवडावे. मात्र, हे चुकीचे होईल. आमच्या पक्षाचा जुना इतिहास आहे. कांग्रेस एक विचारधारा असलेला पक्ष आहे आणि मी त्याच्या आदर करतो. यामुळे मला विश्वास आहे की, पक्ष एका चांगल्या नेत्याची निवड करेल जो पूर्णपणे पक्षाला मजबूत नेतृत्व देऊ शकेल. 


यामध्ये लिहिले आहे की, राजीनाम्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकारी समितीला सल्ला दिला आहे. काही लोकांना नव्या अध्यक्ष निवडीची जबाबदारी द्या. मी या कामी त्यांचे पूर्ण सहकार्य करेन. माझा संघर्ष वाया जाणार नाही. भाजपाला मी नेहमी विरोध केला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत करने. हा खासगी विरोध नाही, तर भारताच्या विचारधारेच्या आधारावर आहे. ही कोणती नवी लढाई नाहीय. ही भारताच्या भूमीवर हजारो वर्षांपासून लढली गेली आहे. जेव्हा ते द्वेष आणि घृणास्पद राजकारण करतात तर मी प्रेमाचे राजकारण करतो. ही लढाई आपल्या करोडो भारतीयांची आहे. आपल्या संविधानावरील हल्ला देशाला डळमळीत करण्यासाठी आहे. मी काँग्रेसचा एक विश्वासू सैनिक आहे आणि भारत मातेचा खरा सुपूत्रही. यामुळे देशासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. 


आम्ही चांगल्या मार्गाने लोकसभा निवडणूक लढविली. आरएसएस आणि भाजपाने जेव्हा देशाच्या सार्वभौम संस्थांवर हल्ले करत ताब्यात घेतले त्याविरोधात मी लढलो. कारण मी देशावर प्रेम करतो. या लढाईच्या काळात मी अनेकदा मला एकटा पडल्याचे पाहिले. या काळात मी पक्षाचे सदस्य, महिला आणि कार्यकर्त्यांपासून खूपकाही शिकलो. त्यांची चिकाटी आणि काम करण्याची पध्दत शिकली. 

राहुल यांनी पुढे लिहिले आहे की, ही लढाई पुढे नेण्यासाठी काँग्रेसला नवीन रूप द्यावे लागेल. आज भाजपा भारतीयांचा आवाज दाबत आहे. अशात काँग्रेसला त्यांना सांगण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. भारत कधीही एकसुरी राहिलेला नाही. सर्व सुरांचा समावेश असलेला देश आहे. अखेर सर्व भारतीयांचे आभार मानतो ज्यांनी मला पाठिंबा दिला. मी सदैव देशासाठी, पक्षासाठी हजर असेन. जेव्हा जेव्हा माझा सल्ला मागितला जाईल तेव्हा मी देईन. आपण सत्तेचा मोह सोडल्याशिवाय विचारधारेच्या लढाईत समोरच्यांना हरवू शकत नाही. 

- Advertisement -