Home शहरे पुणे विद्यापीठामध्ये उद्या चर्चासत्र

विद्यापीठामध्ये उद्या चर्चासत्र

 पुणे:

‘संत परंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या ‘रिंगण’ या वार्षिक अंकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन, संत ज्ञानदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने उद्या, मंगळवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

‘रिंगण’चे आजवर संत नामदेव, संत चोखोबा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार आणि संत सावता माळी हे विशेषांक प्रसिद्ध झाले असून, यातून राज्यभरातल्या तरुण पत्रकारांनी संत परंपरेचा पत्रकारितेच्या नजरेतून वेध घेतला आहे. हाच धागा पकडून ‘संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा’ या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यात संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, डॉ. अभय टिळक, प्रा. हरी नरके, अमर हबीब, लेखक राजा शिरगुप्पे, पत्रकार महेश म्हात्रे, समीक्षक रणधीर शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाच्या सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणारे चर्चासत्र सर्वांसाठी खुले आहे,’ असे ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी सांगितले.