तसेच विद्यार्थी भारतीचा चलो दिल्ली आंदोलन सुरू
मंजिरी धुरींच्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 31 जुलै रोजी देशभरातील अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होती जी 10 ऑगस्ट ला पुढे ढकलण्यात आली असून देशभरातील विद्यार्थ्यांनि मंजिरी ताईंना उपोषण सोडण्याकरता कळकळीची विनंती केली. व ह्या गिधाड कातडीच्या सरकारला आपल्या जीवाची पर्वा नाही पण आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही हे उपोषण मागे घ्या.

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या ज्येष्ठ नेत्या विद्या ताई चव्हाण यांनी मंजिरी धुरिंना फोन करून तुमच्या मागण्या केंद्राकडे न्हेण्यासाठीची जबाबदारी आम्ही घेत आहोत व तसेच पुढच्या 10 ऑगस्ट च्या सुप्रीम कोर्टातील सुनावणी पर्यंत हे उपोषण थांबवा अशी विनंती केली असता मंजिरी ताईंनी हे उपोषण मागे घेत देश भरातील तमाम विद्यार्थ्यांना ही लढाई संपलेली नसून येत्या सुनावणीत जर निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर चलो दिल्ली चे नारे देत मोठ्या प्रमाणात आपल्याला दिल्लीला जावे लागणार आहे असे सांगितले. व संध्याकाळी 07:30 वाजता मैत्रकूल जीवन विकास केंद्राचे प्रमुख संचालक आशिष गायकवाड यांच्या हस्ते मंजिरी ताईंचे उपोषण सोडवले गेले असून गायकवाड यांनी केंद्राच्या व युजीसीच्या बेजबाबदार पणाचा धिक्कार करत मंजिरी धुरींच्या जिद्दी व भक्कम नेतृत्वाचे कौतुक केले व पुढील लढाईस पाठिंबा दिला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.darshanpolicetime.com| आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । टूमबलर |लीन्केडीन | युट्यूब Copyright ©DarshanPoliceTime.Com | All rights reserved.