विधानसभा कामकाज

विधानसभा कामकाज
- Advertisement -

इरशाळवाडी दुर्घटना मुख्यमंत्री सहायता निधीला

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मदत

 मुंबई, दि. २१ : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इरशाळगड येथे काल मध्यरात्री दरड कोसळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात काही नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः नेतृत्व करीत मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला.

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील मृतांचे कुटुंबिय व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे जाहीर केले आहे. श्री.पाटील यांनी वैयक्तिकरित्या एक लाख आणि लोकसहभागातून दहा लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.

काशीबाई थोरात/व.स.सं

- Advertisement -