Home शहरे पुणे विधानसभा निवडणूक लढवणार भानुप्रताप बर्गे ?

विधानसभा निवडणूक लढवणार भानुप्रताप बर्गे ?

0


पुणे : परवेज शेख
पुणे : नुकताच भाजपमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी साहेबराव पाटील यांनी प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट भानुप्रताप बार्गे हे देखील लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. पुण्यात एसीपी म्हणून भानुप्रताप बर्गे निवृत्त झाले आहेत. ते यानंतर आता राजकारणात सक्रिय होत आहेत. शिवाजीनगर किंवा कसबा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जाते. पण त्यांनी अद्याप आपला पक्ष ठरवलेला नाही. पण त्यांच्या संपर्कात अनेक पक्ष आहेत.
गुन्हेगारांना भानुप्रताप बर्गे हे नाव चांगलेच परिचित आहे. बर्गे निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
बर्गेंच्या निवृत्तीपूर्वी पुणे शहरात शुभेच्छांचे पोस्टर्स लागले होते. त्यानंतर या चर्चांनी अधिकच वेग पकडल्याचे पाहायला मिळाले. सर्व राजकीय पक्ष त्यांचा तगडा जनसंपर्क, गुन्हेगारीवर घातलेला आळा यामुळे त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या पाठीशी लोकही राहतील, असे राजकीय विश्लेषक सांगतात.