मुंबई, दि. २७ : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम् व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी ११.५५ वा. कामकाजास सुरुवात झाली.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह सन्माननीय मंत्री, विधानसभा सदस्य उपस्थित होते.
000
शैलजा पाटील/वि.स.अ/
- Advertisement -