मुंबई, दि. 15 : नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांसाठी लोकसभा सचिवालयातील ‘पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसीस (PRIDE) या प्रशिक्षण संस्थेतर्फे संसद भवन, नवी दिल्ली येथे संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन दिनांक 5 व 6 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले आहे. या अभ्यासवर्गासाठी समन्वयाची जबाबदारी राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा व वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, मुंबई यांच्याकडे आहे.
या संसदीय अभ्यासवर्गात सहभागी होण्यासाठी ज्या सदस्यांनी आपली नावे कळविली आहेत त्यांनी दिनांक 5 व 6 एप्रिल 2022 रोजी लोकसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे होणाऱ्या या अभ्यासवर्गाची नोंद घ्यावी, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत दिली.
- Advertisement -