औरंगाबाद, दि.17, (विमाका) :- विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथील खुल्या प्रांगणात समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वराज्य महोत्सव उपक्रमाअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते.
समूह राष्ट्रगीत गायनात यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, अपर आयुक्त अविनाश पाठक, बाबासाहेब बेलदार, उपायुक्त (महसूल) पराग सोमण,उपायुक्त (सा.प्र.) जगदीश मिनियार, उपायुक्त् (पुनर्वसन/पुरवठा) पांडुरंग कुलकर्णी, उपायुक्त (रो.ह.यो.) समिक्षा चंद्राकार, उपायुक्त (विकास-आस्था) सुरेश बेदमुथा, सहाय्यक आयुक्त (मा.व.क.) शिवाजी शिंदे, सहाय्यक आयुक्त (विकास-नियोजन) विणा सुपेकर, तहसीदार महसूल नरेंद्र कुलकर्णी, तहसीलदार (सा.प्र.) अरुणा पावडे, तहसीदार (रो.ह.यो.) श्री.साळोक, तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, अभ्यागत तसेच अल्मीर सेकंडरी स्कूल, रोशनगेट, व अभिज्योत विद्यालय, हडको औरंगाबाद या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.