Home ताज्या बातम्या विमाननगर परिसरातील केमिकल कंपनीला आग

विमाननगर परिसरातील केमिकल कंपनीला आग

0

पुणे : शहरातील विमाननगर परिसरातील बेकर्स केमिकल या कंपनीला आग लागल्याची घटना आज (ता. 30) सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर भागातील बेकर्स केमिकल कंपनीला आज (ता. 30) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच काही मिनिटात अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परंतु रसायनांमुळे आग वाढली.

दरम्यान, या घटनेत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.