Home ताज्या बातम्या विमान वाहतूक अतिवृष्टीतही सुरळीत

विमान वाहतूक अतिवृष्टीतही सुरळीत

0
विमान वाहतूक अतिवृष्टीतही सुरळीत

म. टा. प्रतिनिधी

विलेपार्ले : मुंबईसह कोकणला शनिवार ते बुधवारदरम्यान पावसाने धुवून काढले. परंतु या पावसातही विमानतळ सुरक्षित राहिले. केवळ पहिल्या दिवशी उड्डाणे ठप्प झाली होती.

मुंबई उपनगरात धो-धो पाऊस पडत असला की त्याचा परिणाम विमानतळावर होतो. शनिवार-रविवारच्या रात्री पावसाचा जोर खूप होता. त्यामुळे दृश्यमानता ५०० मीटरपर्यंत खालावली व त्यामुळे विमानतळ जवळपास पाच तास बंद करावा लागला. पावसाचा जोर बुधवार रात्रीपर्यंत कायम होता. पण रविवार पहाटे वगळता त्याचा उड्डाणांना फटका बसला नाही. याआधी मे महिन्यात ‘तौक्ते’ चक्रीवादळादरम्यान विमानतळ ११ तासांसाठी बंद करण्याची वेळ आली होती. पण ‘तौक्ते’ वादळादरम्यानच्या अनुभवाचा फायदा विमानतळाला ९ जूनच्या तसेच आता या आठवड्यातील पावसावेळी झाला. ‘तौक्ते’ वेळी कमी दृष्यमानतेमुळे अनेक विमानांना अन्यत्र वळवावे लागते. पण या पावसात रविवारी पहाटेची नऊ विमाने वगळल्यास एकाही विमानाला अन्यत्र वळवावे लागले नाही.

करोना संकटामुळे सध्या विमान प्रवासासाठी गर्दी नसल्याने मुंबईच्या विमानतळावरील दररोजच्या उड्डाणांची संख्या तशीही कमी आहे. त्यामुळे देखील विमानसेवांना फारसा फटका बसला नाही. परंतु तसे असले तरी-धो पावसादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ व्यवस्थापनाने कामाची चुणूक दाखवली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे असलेल्या हवाई नियंत्रण कक्षाकडूनदेखील (एटीसी) सर्वोत्तम व्यवस्थापन दिसून आले.

Source link