Home ताज्या बातम्या विलासराव देशमुख यांच्या आठवणीने रितेश भावूक

विलासराव देशमुख यांच्या आठवणीने रितेश भावूक

0

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन १४ ऑगस्ट, २०१२ रोजी चेन्नईत झाले होते. आज त्यांचा स्मृतिदिन. राज्यात राजकीय वर्तुळातून विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली जात आहे. याप्रसंगी विलासराव देशमुख यांचा मुलगा, अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. 

रितेश देशमुखने ट्विवरवर फोटो शेअर करत लिहिले आहे-

‘Some say 7 years is a long time, for me it feels like yesterday. Miss You Pappa….. #VilasraoDeshmukh.’ 

 रितेश देशमुखची पत्नी जेनेलियाने आपल्या इन्स्टावर एक फोटो शेअर करत लिहिले आहे- ‘पप्पा मला तुमची रोज आठवण येते.’ 

याआधी रितेश देशमुखने विलासराव देशमुख यांच्या जन्मदिनी म्हणजेच २६ मे ला इन्स्टावर एक फोटो शेअर करत Happy Birthday Pappa…… I Miss You!!! अशी पोस्ट लिहिली होती.