Home ताज्या बातम्या विळेभागड एमआयडीसीतील क्रिप्टझो इंजिनिअरीग प्रा. लि. कंपनीत सिलेंडरचा भीषण स्फोट: स्फोटात -१८ कामगार गंभीररीत्या भाजून जखमी

विळेभागड एमआयडीसीतील क्रिप्टझो इंजिनिअरीग प्रा. लि. कंपनीत सिलेंडरचा भीषण स्फोट: स्फोटात -१८ कामगार गंभीररीत्या भाजून जखमी

0

बोरघर / माणगांव : ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील विळे-भगाड औद्योगिकीक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनिअरीग  प्रा. लि. कंपनीत आज दिनांक १५/११/१९ रोजी सायंकाळी ४ः०० वाजण्याच्या सुमारास सिलेंडर चा प्रचंड मोठा भीषण स्फोट होऊन सदर दुर्घटनेत १८ जण भाजून जखमी झाले असून यातील पाचजण गंभीर रीत्या भाजलेले असून सर्व जख्मींना जे.जे. हॉस्पिटल मुंबईत हलविण्यात आले आहे. या दुर्घटने मध्ये बऱ्याच जख्मींचे डोळे गेल्याची गंभीर घटना घडली आहे. यावेळी कंपनी व्यवस्थापन मात्र कमी पडल्याचे चित्र दिसून आले.
सदर दुर्घटनेची सविस्तर हकीकत अशी की, रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या विळे -भागड एम आय डी सी परिसरातील पॉस्को कंपनी च्या जवळ असलेल्या क्रिप्टझो इंजिनिअरीग प्रा.लि. या कंपनीतील बॉयलर सिलेंडरचा प्रचंड मोठा स्फोट होऊन सदर स्फोटात कंपनीतील सुमारे आठरा कर्मचारी गंभीर रित्या भाजले त्यामुळे त्यांना तात्काळ माणगांव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सदर रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पॉस्को कंपनी व्यवस्थापच्या अाणि माणगांव उपजिल्हा रूग्णालयाच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे.
सदर दुर्घटने मधील १)आशिष २) सुनील रेगोटे वय – ३६ ,३) शुभम जाधव वय -२३, ४) सूरज उमटे वय २३, ५) किशोर कारगे  वय ३०, ६)चेतन कारगे वय २८,७) राकेश हळदे वय ३९, ८) कैलास पडावे वय ३२,९) रूपेश मानकर वय २५,१०) सुरेश मांडे वय २४, ११) प्रसाद नेमाणे वय २३, १२) वैभव पवार वय २६,१३) राजेश जाधव वय २८, १४) आकाश रक्ते वय २० ,१५) मयुर तामणकर वय २४,१६) रजत जाधव वय २३,१७) प्रमोद म्हस्के वय २३, १८) सुनील पाटील इत्यादी जखमींना माणागांव उपजिल्हा रूग्णालयात आणल्या नंतर रुग्णालयाचे अधिक्षक डाॅक्टर गौतम देसाई यांनी प्रसंगावधान राखून क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्यावर त्वरित तातडीने उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले आहे.  
माणगांव पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी तातडीने त्यांचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका बूंंरुगले, पोलिस स्वप्निल कदम आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्त सर्व बाधित रुग्णांना सर्वोतोपरी मदत केली. सदर दुर्घटनेमुळे विळेभागड एमआयडीसी परिसरा सह संपूर्ण माणगांव तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.